संध्या राजन अणवेकर

Dr Sandhya R. Anvekar


मी कर्नाटकाची रहिवासी असून बेंगळुरू येथे राहते. मी कर्नाटक सरकारात इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि बायोटेकनोलॉजि डिपार्टमेंटमध्ये स्टेट ऑफिसर आहे. माझी आई मराठी शाळेत शिक्षिका होती म्हणून दहावीपर्यंत सीमाभागी असलेल्या बेळगावात माझे मराठी माध्यमात शिक्षण झाले. मराठी भाषेची गोडी लागल्याने मी मराठीत कविता लिहायला सुरुवात केली. माझे टोपण नाव ‘संध्या राजन’ आहे.
माझे दोन काव्यसंग्रह आणि एक चारोळीसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
कवितासंग्रह-
मनाचा कवडसा
मी तुझी मीरा

चारोळीसंग्रह-
चारोळी तुझीमाझी

ललितलेख संग्रह ‘जीवाचा चांदवा’ पुण्याहून डिसेंबरपर्यंत प्रकाशित होईल.