समीरा गुजर-जोशी

Sameera Gujar-Joshi

मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच! समीरानं संस्कृत विषय घेऊन बी.ए. आणि एम.ए. (सुवर्ण पदक) पदवी घेतली. तसंच तिनं मराठी विषयातही एम.ए. केलं आहे.

पुरस्कार : निवेदिका म्हणून इंद्रधनू यासारख्या संस्थांनी तिला हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. पण या सगळ्याची
सुरुवात जिज्ञासा संस्थेतून झाली असं ती म्हणते. तिला आजवर “पी सावळाराम”, “नवतारका पुरस्कार”, “माझा पुरस्कार”,  इत्यादी पुरस्कारही मिळाले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.