गणेश अनिल भुसारी

Ganesh Anil Bhusari


मी एक खाद्य इतिहासकार आणि लेखक आहे. भारतीय आणि महाराष्ट्रीयन खाद्य पढार्थचा गमतीदार, मनोरंजक आणि रोमांचक इतिहास जगासमोर आणणे हेच माझे ध्येय. कारण जसा ऐतिहासिक शहराच्या वास्तूंच्या निर्मितीमागे जसा इतिहास असतो, तसा प्रत्येक शहराच्या लोकप्रिय खाद्य पदार्थाचाही इतिहास असतो. इथल्या परंपरांमध्ये या खाद्यपदार्थानं वेगळं स्थान मिळवलेलं असतं. भारतीय विविधतेची ओळख म्हणजे भारतीय खाद्य संस्कृती, त्यातही प्रामुख्याने जेव्हा महाराष्ट्रीयन जेवण किंवा खाद्य पदार्थांचा विषय येतो त्यातील वैविध्य हे काही औरच आहे. घरी केलेले वाटण, शंभर प्रकारच्या भाज्या, बाजरीची भाकरी आणि गोड पदार्थांची लज्जत या गोष्टी मात्र आता हरवत चालल्या आहेत. याची जपणूक करण्याची जबाबदारी आताच्या खवैय्यांची आहे. काळाच्या ओघात हरवत चाललेली आपली खाद्य संस्कृती आणि तिचा इतिहास विविध माध्यामातून प्रेक्षकांपुढे आणणे.




Normal

लेखक / लेखिका