औरंगाबाद शहरातील उत्कृष्ट प्रकारचे लेखन करणारे, व नियोजनबध्द प्रकाशकाचे गुण याचा संगम असणारं नाव म्हणजे बाबा भांड!
साकेत या प्रकाशनसंस्थेचे प्रमुख व या संस्थेला लोकप्रिय व यशाच्या आभाळामध्ये स्वैर घिरटया मारण्याकरिता बळ देणारा तेजाचा पुंजका असे त्यांचे अलंकारिक शब्दांमध्ये वर्णन करता येईल. कारण या प्रकाशनसंस्थेच्या प्रत्येक धाडसी व कल्पक निर्णयांमध्ये भांड यांचे मोलाचे योगदान आहे.
बाबा भांड यांच्या नावावर “पुणे जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार”, “बालवीर चळवळीसाठी राष्ट्रपती पदक”, “दशक्रिया” कादंबरीसाठी “ महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार”, “महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हरी नारायण आपटे पुरस्कार ” यासह अनेक महत्त्वाचे साहित्य पुरस्कारांसोबतच, “काजोळ”, “कृष्णा: अग्निसमाधीतला योगी”, “तंट्या”, “जारंगा”, “तंट्या भिल्ल आणि शेतकरी-आदिवासी उठाव (संदर्भ साहित्य)”, “पांढऱ्या हत्तीची गोष्ट(कादंबरी)”, “श्रेष्ठ भारतीय बालकथा” अश्या ७५ पेक्षा अधिक स्वलिखीत कादंबरी व पुस्तके भांड यांच्या नावावर जमा आहेत. आजतागायत बाबा भांड यांच्या साकेत प्रकाशनने सुमारे दीड हजार पेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित केली असून यामध्ये ललित गद्य, प्रवासवर्णने, आरोग्यविषयक ,किशोरवयीन कादंबर्या, बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठीच्या पुस्तकांचा समावेश आहे.
ऑगस्ट २०१५ मध्ये राज्य सरकारकडून साहित्य व संस्कृती मंडळावर बाबा भांड यांची नियुक्ती झाली आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित