अरविंद हरिपंत टोळ्ये

Arvind Haripant Tolye


स्वतःबद्दल सांगण्यासारखं काही नाही.लाखो जन्मतात …..जगतात आणि मरून जातात त्यातीलच एक पामर.
स्वभावाने हळवा, सहनशील, कणखर बाणा,संकटाशी झुंज देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा साठी ओलांडलेला माणूस !
आयुष्यात यश-अपयशाचा ऊन्हसावलीचा खेळ अनुभवत येथवर पोचलोय.
१९८० ते १९९० या काळात खूप लिहीत होतो.सुमारे २००कविता व १०० हुन अधिक कथा त्याकाळात प्रसिद्ध झाल्यात.शिक्षण व्यवस्था, अर्थकारण यावर दै सकाळ मधून ललित लेख प्रसिद्ध झालेत.
ऑटोमोबाईल, वैद्यकीय,औषधे,गारमेंट्स, फायनान्स,अशा विविध उद्योग क्षेत्रात दीर्घ काळ व्यवसायाचा अनुभव.
आता हि एक ऑटोमोबाईल कंपनीचा CEO म्हणून कार्यरत आहे.
मनाला जे दिसते, जे भावते, जे रुचते, जे बोचते त्यावर लिहिण्याची प्रचंड उर्मी घेऊन इथे आलोय.
कमी लिहीन पण जे लिहतो ते प्रामाणिक असेल.लिखाणातून नवं उद्योजकांना सल्ला देत राहीन.माणसाची योग्य वाढ होण्यासाठी संस्कार आवश्यक असतात आणि ते माझ्या लिखाणातून स्त्रवतील, पाझरतील हि अपेक्षा मनी बाळगून माननीय साहित्यिक श्री श्रीकृष्ण जोशी यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने लिहिता होतोय.
आपण सर्व जण सुज्ञ आहात. आपल्या प्रतिक्रिया माझ्या लिखाणासाठी मार्गदर्शक दीप स्तंभ ठरतील.
वाचा आणि व्यक्त व्हा !


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/arvindtolye1959