धीरज गजेंद्र नवलखे

Dheeraj Gajendra Navlakhe

“माझी डायरी”
मित्रानो,
कविता म्हणजे काय ? शब्दांची जुळवाजुळव किंवा मनातील भावना फक्त कागदावर उतरवणं म्हणजे कविता नक्कीच होत नाही. मी कोणी मोठा कवी किंवा विचारवंत नाही. पण माझ्याबाबतीत काळजाच्या आत जेव्हा खट्ट्कन काहीतरी हलतं, सगळ्या वेदना-संवेदना एकवटून येतात, मन काठोकाठ भरून जातं, वेळ-काळाचं काहीही भान राहत नाही आणि न राहवून जेव्हा सगळ्या जाणिवांशी प्रामाणिक राहून रितं व्हावंच लागतं….. तेव्हाच कविता जन्म घेते…

मित्रानो, मी माझ्यासाठी लिहीत आलो आहे…पण आता असं वाटतंय कि “माझी डायरी” खुली करावी आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या कविता आणि गझल सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे.
“माझ्या डायरीतले” शब्द तुमच्या भावनांशी एकरूप झाले तर नक्की कळवा आणि ‘माझी डायरी’ चॅनलला अवश्य Subscribe करा…

मी शब्दांच्या लाटांवरती, शोधत बसतो तिजला
अन् अर्थाच्या पैलतिरी ती, मला खुणावत असते.
— धीरज


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/mazidiary