मनोहर लेले

Manohar Lele
जन्म दिनाक: १३ डिसेंबर १९४१

जन्म- १३ डिसेंबर १९४१.

हे निवृत्त अभियंते (Engineer) असून सध्या ते अमेरिकेतील टेक्सास मध्ये राहतात.

श्री लेले हे संत तुलसीदासांच्या रामायणावर संशोधन करतायेत. नुकतंच त्यांचं तुलसीदास रचित सुंदरकांड हे इ-बुक प्रसिध्द झालं. या इ-पुस्तकात लेले यांनी तुलसीदासांचं साहित्य श्राव्य माध्यमातही उपलब्ध करून दिले आहे. या शिवाय तुलसीदासांच्या दोह्यांचे अर्थ वाचकांसाठी सुस्पष्ट करून दिला आहे.

अमेरिकेत राहून भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्याचे सदकार्य श्री लेले करत आहेत. हे संत साहित्य अर्थासकट पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणं हेच मनोहर लेले यांचं उदिष्ट्य आहे.

संपर्कासाठी पत्ताः manoharlele@gmail.com