मी पद्माकर रघुनाथ देशपांडे, जन्म नाशिक दि.२३ नोव्हेंबर १९६२ . शिक्षण एम ए मराठी,एम फील (विषय: “मनोहर शहाणे यांचे कादंबरी विश्व”)बीसीजे, गेल्या ३३ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. बंधमुक्त हा माझा काव्य संग्रह १९८६ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने प्रकाशित झाला. त्यानंतर २००२ मध्ये “महासुखाचा सोहळा” हे संपूर्ण ज्ञानेश्वरी सोप्या मराठीत सांगणारे पुस्तक लिहिले. त्यनंतर वैशाली प्रकाशनाने “साधी सोपी ज्ञानेश्वरी”हे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे हिंदी भाषांतर प्राचार्य डॉ.बापूराव देसाई (डी लिट ) यांनी केले ते देखील वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. कथा,कविता,लेख, वृत्तपत्रीय लेखन केले असून शेकडो लेख गावकरी,देशदूत,पुण्यनगरी,मुंबई तरुण भारत, पूर्वी लोकसत्ता, सकाळ,नवशक्ती,अशा अनेक नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. सध्या मुंबई तरुण भारतच्या नशिक कार्यालयाचे ब्युरो चिफ म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या कुसुमाग्रज पुरस्कृत कवी गोविंद काव्य स्पर्धेत १९८४ मध्ये विजेता, अ वा वर्टी कथा स्पर्धेत २०१६ मध्ये दुसरे परीतोधिक, पूर्वी देखील अनेक पारितोषिके प्राप्त. गरजेप्रमाणे एकांकिका, पटकथा लेखन देखील केले आहे.
पद्माकर रघुनाथ देशपांडे
Padmakar Raghunath Deshpande
TS - 2
TS- 3
TS - 5