“गावगाडा” या पुस्तकाचे लेखक, ग्रामीण समाजरचना व मागास जातिसंस्थेचे अभ्यासक त्रिंबक नारायण अत्रे यांचा जन्म ५ सप्टेंबर १८७२ रोजी झाला.
“गावगाडा”त पारंपारिक बलुतेदारांसह विविध जाती-जमातींचा परिचय त्यांनी करुन दिला असून समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तक आजही उपयुक्त आहे.
“गुन्हेगारी जाती” हे पुस्तकही अत्रे यांनी लिहिले, तसेच “सक्तीचे शिक्षण” हा महत्वाचा निबंध “विविधज्ञानविस्तार” मध्ये लिहिला.
Trimbak Narayan Atre