फेसबुक पोस्ट वर किती लाईक आले किंवा किती कॉमेंट आल्या यावर लेखकाची लोकप्रियता ठरवण्याचा एक वेगळाच पायंडा सध्या पडत आहे.
खरंच आपण फेसबुकवर आपलं अस्तित्व पणाला लावणं आवश्यक आहे का? फेसबुकवरची आपली एखादी पोस्ट किती जण खरोखर वाचतात.. किती त्याला लाईक करतात आणि किती जण त्यावर कॉमेंट करतात? हा खरंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे पण तो तेवढाच दुर्लक्षिला गेलेला आहे.
बर्याच लोकप्रिय लेखकांच्या मी बघितलेल्या अनेक चांगल्याचुंगल्या फेसबुक पोस्टना सर्वसाधारणपणे ५०० च्या आसपास लाईक्स आणि जास्तीतजास्त २५० ते ३०० कॉमेंटस आलेल्या दिसल्या.
Be the first to comment