संत ज्ञानेश्वर

Sant Dnyaneshwar
जन्म दिनाक: १२७५
मृत्यू दिनांक: १२९६

संत ज्ञानेश्वर (जन्मः १२७५ समाधीः १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत. वारकरी संप्रदायाचे दैवत.

संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवदगीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवगीतेवर निरूपण भाषांतर केले जे ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई या कुळकर्णी दांपत्याच्या पोटी झाला. निवृत्ती त्यंचे थोरले भाऊ तर धाकट्या भावंडांची नावे सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची धाकटी भावंडे होती.

त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. तत्कालीन समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रम स्वीकार करणे मंजूर नव्हते त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. समाजाकडून होणारा त्रास सहन न झाल्याने विठ्ठलपंत आणि रुक्मीणीबाई यांनी देहत्याग केला.

आईवडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. तत्कालीन सनातनी समाजाने या कुटुंबाला वाळीत टाकले. मुलांची मुंज करणेही नाकारले.

Advt1Right

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या मुखी बसलेला एक सर्वसामान्य संतांचा मेळा आहे. निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर आपले गुरू मानतात.

चारही मुले सदगुणी, सत्यवचनी, सदाचारी होती. संस्कृत भाषेतील भगवदगीतेचा अर्थ लोकभाषेत सांग, अशी ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांनी आज्ञा केली आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी हे ज्ञानभांडार आहे. भाषेत विलक्षण गोडवा आहे. उपमा, उत्प्रेक्षा, व्याजोक्ती, शब्दालकांर यांचा प्रचंड सागर आहे. त्यातील ओव्यांमधून वैद्यकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, खगोलशास्त्र, योगशास्त्र यांतील एकजीवनव्यापी

भक्तीची वेल वाढली आहे. आकाशभर विस्तारली आहे. त्या वेलीला असंख्य अनुभवरूपी फुले लागली आहे. ज्ञानबोधाच्या रसाळ वाकप्रवाहांत भक्त डुंबून जातात.

ज्ञानेश्वरीच्या रुपाने हिंदू धर्माचा धर्मग्रंथ लोकभाषेत आला. विश्वरूपाचे दर्शन जसे ज्ञानेश्वरांना झाले तसे ते त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविले. तो ग्रंथ आटोपताच अमृतानुभव लिहून ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्या वेळी ते फक्त २२ वर्षांचे होते.

पसायदानात त्यांनी मागणे केले आहे.

आता विश्वात्मकें देवें ! येणे वाग्यज्ञें तोषावे !
तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !!
जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रति लाभो !!
भूतां परस्परें घडों ! मैत्र जीवाचे !!

विश्वबंधुत्वाची प्रेरणा देणारा हा ग्रंथ जगात अनेक भाषांत भाषांतरित झाला. या ग्रंथामुळे भारतीयांतच नव्हे, तर जगात भारतीय संस्कृतीकडे, संतवाडःमयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. आजही जगात ज्ञानेश्वरीचे अध्ययन चालू आहेच.

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ

भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी

शेकडो मराठी अभंग (उदा.ज्ञानेश्वर हरिपाठ)
चांगदेव पासष्टी
अमृतानुभव

संत ज्ञानेश्वरांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.

## Sant Dnyaneshwar