(डॉ.) राणी बंग

Dr. Raani Bang

डॉ.राणी बंग यांनी १९८०-९० च्या स्त्री आरोग्य नीतीच्या जागतिक पातळीवरील प्रवक्ता होत्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ड हेल्थ असेंबलीला संबोधित करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या राष्ट्रीय जनसंख्याअयोग व अनेक राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय संघटनांवर सदस्य आहेत. दारु व बाल मृत्यू या संदर्भात त्यांनी केलेले कार्य महत्वाचे ठरले असून सर्चने बालमृत्यू कमी

करण्यासाठी सुचविलेल्या उपायांना आता राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर मॉडेल म्हणून मान्यता मिळाली आहे. स्त्री जीवनावर डॉ.राणी बंग यांनी लिहीलेली गोईणकानोसा ही पुस्तके मार्गदर्शक ठरली आहेत. डॉ.राणी व अभय बंग यांना यापूर्वी महाराष्ट्रभूषण जसेच टाईमस् साप्ताहिकाचा ग्लोबल हेल्थ हिरोज हे पुरस्कारांनी सन्मानित कारण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या सामाजिक संस्थेच्या संस्थापक व सहसंचालिका डॉ.राणी बंग यांची भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे २००८ मध्ये दिल्या जाणारर्‍या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.

विज्ञान व तंत्रज्ञनाच्या माध्यमातून स्त्रीयांच्या विकासासाठी कार्य करणार्‍या स्त्री वैज्ञनिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

## Rani Bang