मदन महादेव देशपांडे

Madan Mahadev Deshpande
जन्म दिनाक: ४ जुलै १९३१

एक सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, कुटुंबवत्सल, लेखक, यशस्वी उद्योजक, शास्त्रज्ञ व डॉ. होमी भाभांचे जीवनाभ्यासक श्री. मदन महादेव देशपांडे. जन्म ४ जुलै १९३१ परळ, मुंबई येथे झाला. त्यांच्यावर काव्य, संस्कृत, वाड्मय, गांधी तत्वज्ञान व विचारांचा प्रभाव आहे. आईच्या विचारांचा व कृतीचा ही त्यांच्यावर बलदंड प्रभाव होता.

त्यांचे पिताश्री हे केवळ कुटुंब प्रमुखच नव्हते तर उत्तम हिशोबनीस व व्यवहारनिपुण होते. लीनतेचे मूर्तिमंत उदाहरण व सत्याचाच आग्रह धरणारे होते. नोकरीत मन न रमल्याने पिताश्रींच्या सल्ल्याने व मदतीने १४ मे १९६४ ह्या अक्षयतृतीयेच्या शुभमुहुर्तावर, “मिलबॉर्न सिरप” च्या उत्पादनास प्रारंभ झाला. आज मिलान लॅबोरेटरीज जवळ जवळ १८ देशांत, आजच्या जागतिक स्पर्धेच्या काळात तेथील असंख्य स्पर्धकांशी, यशस्वीपणे अन् खंबीरपणे मुकाबला करीत घोडदौड करीत आहे.

(संदर्भ : श्री. मदन देशपांडे यांच्या पुस्तकातील लेखक परिचयावरुन संपादित)