सुधीर वासुदेव नांदगावकर

Sudhir Vasudev Nandgaonkar


चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणारे सुधीर नांदगावकर यांनी एम.ए. ची पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. आचार्य अत्रे यांच्या दै. मराठा मध्ये चित्रपट समीक्षक म्हणून ते उपसंपादक होते. पोतदार महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. सुधीर नांदगावकर यांनी मुंबईत प्रभात मित्रमंडळ ह्या फिल्म सोसायटीची स्थापना केली.

सुधीर नांदगावकर, हे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेच्या भारतीय शाखेचे अध्यक्ष होते. त्यानिमित्त जगातील अनेक महोत्सवात ज्युरी म्हणूनही त्यांनी काम केले. नांदगावकर हे मुंबईच्या “मामी”, “थर्ड आय एशियन” चित्रपट महोत्सवाचे १० वर्षं ट्रस्टी व संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत बर्‍याच पुस्तकांचे लेखनही केले आहे. अटलजींचे आवाहन (भाषांतरीत), राजनीती से उसपार (मा. अटलजींच्या हिंदी भाषणांचे संपादन) सत्यजीत रे ह्यांचा सिनेमा (अनुवादित), सिनेमा संस्कृती (स्वतंत्र पुस्तक), इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रभात चित्र मंडळाची शाखा त्यांनी दोन वर्षं चालवली. यावर्षी आशिया फिल्म फेस्टिव्हलचे त्यांनी आयोजन केले.