अच्युत गोडबोले

Achyut Godbole

अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रमुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असताच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्राविण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली.

चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतित केला. आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्वाच्या हुद्द्दयांवर सेवा बजावली.

अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांसाठी विपुल प्रमाणात लेखन – स्तंभलेखन केले आहे. ‘बोर्डरूम’ ‘नादवेध’ आणि ‘किमयागार’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्वज्ञान, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे.

अच्युत गोडबोले यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.