अरुण बाळकृष्ण कोलटकर

Arun Balkrushna Kolatkar
जन्म दिनाक: १ नोव्हेंबर १९३२
मृत्यू दिनांक: २५ सप्टेंबर २००४

अरुण कोल्हटकर, अरुण हे महाराष्ट्रातील बहुभाषिक कवी होते. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषेत कविता लिहिल्या आहेत.

कोल्हटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदविधारक असलेले कोल्हटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते.

१९५० – १९६०च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मिश्र मुंबई छाप मराठी, हिंदीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते.

‘न्यूयॉर्क टाइम्स क्लासिक बुक्स’ या यादीत त्यांच्या ‘जेजुरी’ या इंग्लिश काव्यसंग्रहाचा समावेश आहे.

त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह

मराठी:- अरूण कोल्हटकरच्या कविता (१९७७) चिरीमिरी (२००४) भिजकी वही (२००४) द्रोण (२००४)

इंग्लिश:- जेजुरी Kala Ghoda Poems Sarpasatra The Boatride

अरूण कोल्हटकरांना त्यांच्या भिजकी वही काव्यसंग्रहासाठी २००४ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित करण्यात आलं. तसंच मराठवाडा सहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार,राष्ट्रकुल काव्य पुरस्कार १९७६ हे ही पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांचे २५ सप्टेंबर २००४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.