महेश एलकुंचवार

Mahesh Elkunchvar

त्रिधारा या नाटय़ प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. रुद्रवर्षां, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, गाबरे, सुलतान (एकांकिका संग्रह) ही एलकुंचवारांची गाजलेली नाटके आहेत.
आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत तर ,यातील काही नाटकांचे बंगाली भाषेतही अनुवाद झाले आहेत. ‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आणि प्रतिभावंत साहित्यिक म्हणून महेश एलकुंचवार यांना मान्यता मिळाली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.