जन्म- जुलै ३१, १८७२
– नोव्हेंबर १०, १९४१
लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे मराठी लेखक, संत साहित्याचे अभ्यासक होते. पांगारकरांचा जन्म जुलै ३१, १८७२ रोजी महाराष्ट्रातील चिपळूण गावी झाला. शालेय शिक्षणाकरता ते चिपळुणाहून पुण्यास ‘न्यू इंग्लिश स्कूल’ शाळेत दाखल झाले. लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना शाळेत शिकवत होते. त्यांनी ‘मुमुक्षू’ हे नियतकालिक साप्ताहिक स्वरूपात तेरा वर्षे आणि मासिक स्वरूपात मासिक स्वरूपात बारा वर्षे चालवले. मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथही त्यांनी लिहिला. इ.स. १९१० साली त्यांनी ‘तुकाराम चरित्र’ लिहिले. नोव्हेंबर १०, १९४१ रोजी पांगारकरांचे निधन झाले.