०४ नोव्हेंबर २००५
२००५> कोशकर्ते, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक व इतिहासकार सदाशिव मार्तंड गर्गे यांचे निधन. काही नोंदीप्रमाणे, त्यांची जन्मतारीखही ४ नोव्हेंबर १९२० अशी आहे. “भारतीय समाजविज्ञान कोशा” च्या संपादनाची धुरा त्यांनी दीड तप सांभाळली, तसेच रियासतकार सरदेसाईंच्या सर्व “रियासत” खंडांचे संपादन केले. भारतीय राज्यघटनेचा इतिहास, राज्यशास्त्राचा विकास, समाजवादी समाजरचना, सुलभ राज्यशास्त्र अशी पुस्तके त्यांनी लिहिली. अर्थात, “भारतीय समाजविज्ञान कोशा” चे संपादन हे स.मा. गर्गे यांचे उत्तुंग कार्य ठरले.
mss