सातवळेकर, श्रीपाद दामोदर – 0262
३१ जुलै १९६८
१९६८> वैदिक तत्वज्ञानाचे भाष्यकार वेदमूर्ती श्रीपद दामोदर सातवळेकर यांचे निधन. जवळपास ४०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. वैदिक राष्ट्रगीत व वैदिक प्रार्थनांची तेजस्विता या लेखांमुळे त्यांना इंग्रजांनी कारावासात धाडले. “भारतीय संस्कृती” हा ५० लेखांचा संग्रह, “संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)” वेदकालीन समाजदर्शनाची १२ पुस्तकांची मालिका, वेदांतील देवमंत्रांची “दैवतसंहिता” आदी पुस्तके त्यांनी सिद्ध केली होती.
—————————————————————————————————————————
सातवळेकर, श्रीपाद दामोदर – 0466
११ सप्टेंबर १८६७
१८६७> वेदांचे गाढे अभ्यासक (वेदवाचस्पती) श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. मराठी, हिंदी व इंग्रजी मिळून तब्बल ४०० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. “वैदिक धर्म” हे हिंदी व “पुरुषार्थ” हे मराठी मासिक त्यांनी काढले होते. “संस्कृत स्वयंशिक्षक” या मालेत २४ पुस्तके, “भारतीय संस्कृती” हा ५० लेखांचा संग्रह, एक हजार पृष्ठांची “उपनिषद भाष्य ग्रंथमाला” असे लेखन त्यांनी केले.
mss