१९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला.
“दत्त दिगंबर दैवत माझे”, “देव माझा विठूसावळा” या गीतांचे कवी हणमंत नरहर जोशी म्हणजेच “कवी सुधांशु” यांचे निधन. आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
औदुंबर येथे “सदानंद साहित्य मंडळा” ची स्थापना तसेच १९३९ पासून “औदुंबर साहित्य संमेलना” ची सुरुवात त्यांनी केली व आजही अध्यक्ष आणि फाजिल मानपानांविनाहे संमेलन पार पडते. १९७४ मध्ये त्यांना “पद्मश्री” किताब मिळाला होता.