आनंदीबाई शिर्के या त्यांच्या ‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे प्रसिद्ध झाल्या. त्यांचा जन्म ३ जून १८९२ रोजी झाला. आनंदीबाईंनी ‘सांजवात’या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.
“रुपाली” ही कादंबरी, “भावनांचे खेळ आणि इतर गोष्टी” सह ७ कथासंग्रह, ३ बालकथासंग्रह लिहिलेल्या आनंदीबाईंनी बदलत्या काळातील स्त्रीचे वास्तव दर्शन घडविले.
कथालेखिका व “सांजवात” या समाजदर्शी आत्मचरित्राच्या कर्त्या आनंदीबाई शिवराम शिर्के यांचे निधन ३१ ऑक्टोबर १९८६ रोजी झाले.