गिरीश वासुदेव

Girish Vasudev

मृत्यू दिनांक: ३ फेब्रुवारी २०१९

गिरीश वासुदेव हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ होते. १९९१ च्या उदारीकरणानंतर देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीला साचेबद्ध आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

परदेशी गुंतवणुकीसाठी त्यावेळी स्थापन झालेल्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डावर (एफआयपीबी) वासुदेव यांनी अनेक वर्षे तज्ज्ञ सदस्य म्हणून सेवा दिली. राज्यात परदेशी गुंतवणूक आणण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेवरील सदस्य या नात्याने राज्याला लागणारी आर्थिक मदत केंद्रातून आणण्याच्या कामी गिरीश वासुदेव हे महत्त्वाचा दुवा होते.

काही बँकांचे संचालक या नात्याने बँकिंग क्षेत्रातही सुधारणांसाठी त्यांनी प्रयत्न केले.

उदारीकरण व अर्थविषयक धोरणांसंबंधी त्यांनी नियतकालिके, मासिके, वृत्तपत्रे यामधून लेखन केले आहे. १९८० ते २०१० या कालखंडातील अनेक अर्थतज्ज्ञांशी त्यांचा संबंध होता. सहकारी बँक क्षेत्रातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मागील आठ-दहा वर्षांपासून ते अर्थविषयक मुख्य प्रवाहापासून दूर होते.

गिरीश वासुदेव यांचे रविवार ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्कजवळील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.

## Girish Vasudev




Listing
d - ३ फेब्रुवारी २०१९
LS - Dead