डॉ. अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe
जन्म दिनाक: १८ सप्टेंबर १९८०

अमोल कोल्हे हे मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिकासृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते अभिनय क्षेत्रासोबत राजकारण क्षेत्रातही सक्रिय आहेत. सध्या ते खासदार पदावर कार्यरत आहेत.२०१९ , मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.

अमोल कोल्हे ह्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९८० रोजी नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

अमोल कोल्हे ह्यांनी केलेल्या ऐतिहासिक मालिका सर्वश्रुत आहेत. त्याने केलेली राजा शिव छत्रपती ( स्टार प्रवाह ) , स्वराज्य रक्षक संभाजी ( झी मराठी ) , वीर शिवाजी ( कलर्स हिंदी ) ह्या प्रेक्षकांच्या विशेषतः तरुणांच्या गळयातल्या ताईत बनल्या.

पुढे अमोल ह्यांनी अधुरी एक कहाणी ( झी मराठी ) , ओळख ( स्टार प्रवाह ) , या गोजिरवण्या घरात ( ई टीव्ही मराठी ) सारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांतून अभिनय केला.

चित्रपट क्षेत्रात त्यांनी मुलगा , ऑन ड्युटी २४ तास , आघात , राजमाता जिजाऊ , साहेब , रंगकर्मी , रमा माधव , बोला अलख निरंजन , मराठी टायगर्स सारख्या विविध चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली.

अमोल कोल्हे ह्यांनी नाट्य क्षेत्रातही काम केले आहे. त्यातील अर्धसत्य आणि शिवपुत्र शंभूराजे ही नाटकं वाखाणण्याजोगी होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

## Dr Amol Kolhe