(डॉ.) लीला गणेश दीक्षित

Dr. Leela Ganesh Dixit
बालसाहित्यकार

जन्म दिनाक: ४ फेब्रुवारी १९३५
मृत्यू दिनांक: १३ ऑक्टोबर २०१७

बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता.

डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार राज्य पुरस्कार, भा. रा. तांबे पारितोषिक, ना. धों. ताम्हनकर पारितोषिक, वा. ल. कुळकर्णी पारितोषिक, दि. के. बेडेकर पारितोषिक आणि मसाप पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

डॉ. लीला गणेश दीक्षित यांचे १३ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.

#Dr.LeelaGaneshDixit




Listing
b - ४ फेब्रुवारी १९३५
d - १३ ऑक्टोबर २०१७
LS - Dead