दामोदर दिनकर कुलकर्णी

मधुकाका कुलकर्णी
Damodar Dinkar Kulkarni

जन्म दिनाक: २३ ऑक्टोबर १९२३
मृत्यू दिनांक: २२ फेब्रुवारी २०००

श्री विद्या प्रकाशनचे दामोदर दिनकर कुलकर्णी उर्फ मधुकाका यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२३ रोजी झाला.

मधुकाका नावाने परिचित असणारे दामोदर दिनकर कुलकर्णी हे १९४७ ते १९६२ या काळात कॉन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे येथे तसेच १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी संयुक्त साहित्य या संस्थांमध्ये काम केले.

पुढे त्यांनी १९६८ मध्ये श्री विद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. ‘वाळवंटातील चंद्रकोर’ हे त्यांचे पहिले प्रकाशन. ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके प्रकाशित केली. ‘आंबेडकरी चळवळ’, ‘अक्करमाशी’, ‘उचल्या’, ‘काबूलनामा’, ‘श्री विठ्ठल एक महासमन्वय’,’मेड इन इंडिया’, ‘लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक’ ही त्यांनी प्रकाशित केलेली महत्वाची पुस्तके.

मधुकाका कुलकर्णी मुंबई येथे ३ जून १९९० रोजी झालेल्या सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.

‘प्रकाशकनामा’ हे त्यांनी आत्मचरीत्र पण लिहिले आहे.

मधुकाका कुलकर्णी यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मधुकाका कुलकर्णी यांना आदरांजली.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

#MadhuKakaKulkarni #DamodarDinkarKulkarni




Listing
b - २३ ऑक्टोबर १९२३
d - २२ फेब्रुवारी २०००
LS - Dead