ज्येष्ठ सिनेपत्रकार व लेखक व हौशी सिनेप्रेमी अरुण पुराणिक यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९५० रोजी झाला.
अरुण पुराणिक यांच्या कुटुंबाला संगीताची पार्श्वपभूमी आहे. त्यांचे आजोबा पंढरपूरकर बुवा हे ‘गंधर्व नाटक कंपनी’त मुख्यव गायक म्हाणून कामास होते. त्यां्नी अभिनेत्री शांता आपटे यांना शास्त्री य संगीताचे धडे दिले होते.
पासष्ट हजार हिंदी क्लासिकल आणि फिल्मी गाण्यांचा संग्रह, दहा हजारहून अधिक सिनेमांची पोस्टर्स, बुकलेट्स, ग्लास लाईट असं पब्लिसिटी मटेरीअल, लीला चिटणीस ते हेमामालिनी अशा हिरॉईन्सचे जवळपास साडेसातशे दुर्मिळ फोटोज्, हे सगळं कलेक्शन अरुण पुराणिक यांच्या कडे आहे.
अरुण पुराणिक यांच्याकडे एकोणीशे पासष्ट सालापर्यंतचं सिनेमांचं, एकोणीशे दहापासून ते एकोणीशे पन्नासपर्यंतचं भारतीय आणि वेस्टर्न संगीत असा अमुल्य ठेवा आहे. या संग्रहातील काही माहिती पुराणिक यांनी डिजिटलाईज केलीय. सिनेमावरील अनेक पुस्तकांमध्ये पुराणिक यांच्या संग्रहातील फोटो वापरण्यात आलेत. फिल्मस्टार देवानंद यांच्या निधनानंतर मेहबूब स्टुडिओमध्ये श्रद्धांजली सभा आयोजीत करण्यात आली होती त्या सभेत पुराणिक यांच्याकडील देवानंदचे फोटोज् वापरण्यात आले होते. त्यांच्याजवळील फोटोज् वापरुन लता आणि हिरॉईन्स संकल्पनेवर कॅलेंडरही प्रसिद्ध झालय.
एक अभ्यासक म्हणून अरुण पुराणिक यांना आजही मुंबईतल्या सोमय्या कॉलेज, किर्ती कॉलेजमधून बोलावणी येतात. एशियाटीक लायब्ररीमध्ये त्यांची व्याख्यानं होतात. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या संग्रहातील काही गोष्टींचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. तिथे लोकं भेटतात, बोलतात. पण ते पुरेसं नाहीये. या विषयात अधिक संशोधन करणारी माणसं निर्माण झाली पाहिजे. हा सगळा संग्रह लोकांना पहाता यावा, सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळता यावा यासाठी एक स्टडी सेंटर उभारण्याचा पुराणिक यांचा विचार आहे.