अक्षय सुर्यकांत कुंभार

Akshay Suryakant Kumbhar


सर्व क्षेत्रात अपयश मिळाल्यावर आपल्या रक्तात लेखन साठलय,हदयात भावना साठल्यात, मेंदूत माणुसकीचे विचार साठलेत, एकही पुस्तक न वाचता शब्द मांडणी करण्याची अनोळखी शक्ती मनात वावरत असल्याची जाणीव झाली नंतर एक जींवत हदयस्पर्शी लेखक जन्माला आला.त्याच्या लिखाणाला वाचकांचा अनअपेक्षित प्रतिसाद कौतुकाचा पाऊस, आपुलकीची सावली मिळाली.
नंतर ठरवल आपण मोठ्या लेखकांसारखे झालो नाही तरी चालेल. पण लिहण सोडायच नाही. लिखाणावर जीवापाड बेभान प्रेम करायच. सगळ जग आपल्याला वेड म्हणाल तरी चालेल. पण लिखाणावर एवढ प्रेम करायच कि प्रत्येकाला लेखकच बनावस वाटल पाहिजे. मला माणसाला विचार करायला लावणाऱ्या कथा लिहायला आवडतात. ज्या गोष्टी माणुसकी जिवंत करतील अशा कथा मला लिहायला आवडतात.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/maneklekhak