आनंद रतन यादव

Anand Ratan Yadav
जन्म दिनाक: ३० नोव्हेंबर १९३५

जन्म-नोव्हेंबर ३०, १९३५
आनंद यादव हे प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.

कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.

त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

आनंद यादव यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-

काव्यसंग्रह

हिरवे जग १९६०
मळ्याची माती१९७८
मायलेकरं (दी‍र्घकविता)१९८१

कथासंग्रह

खळाळ १९६७
घरजावई १९७४
माळावरची मैना १९७६
अदिताल १९८०
डवरणी १९८२
उखडलेली झाडे १९८६

व्यक्तिचित्रे

मातीखालची माती (१९६५)

ललितलेख संग्रह

स्पर्शकमळे (१९७८)
पाणभवरे (१९८२)

कादंबरी

गोतावळा १९७१
नटरंग १९८०
एकलकोंडा १९८०
माऊली १९८५

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.