५ सप्टेंबर १८९५
१८९५> इतिहाससंशोधक व सांस्कृतिक ठेवा ठरलेल्या अनेक उत्तम ग्रंथांचे संपादक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. “रघुनाथ पंडित विरचित दमयंती स्वयंवर”, “गोमांतकाची सरस्वती”, “डॉ. भाऊ दाजी: काळ आणि कर्तृत्व”, “दादोबा पांडुरंग तर्खडकरांचे चरित्र व आत्मचरित्र”, “लोकहितवादी लेखसंग्रह”, “नवनीत” आदी ग्रंथ, तसेच दुर्मीळ ख्रिस्ती-मराठी पोथ्या यांचे संपादन त्यांनी केले. मराठीत दर्जेदार ललितलेख, तसेच इंग्रजीत गोव्याचा तथ्यपूर्ण इतिहास मांडणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली.
mss