मराठी कवी, शाहीर अनंत फंदी यांचा जन्म १७४४ सालात झाला.
उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर म्हणजे अनंत फंदी.
दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. ‘रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते.
शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत.
अनंत फंदी यांचे निधन ३ नोव्हेंबर १८१९ रोजी झाले.