अनिल सदाशिव बर्वे

Anil Sadashiv Barve
जन्म दिनाक: १७ जुलै १९४८ 
मृत्यू दिनांक: ६ डिसेंबर १९८४

अनिल सदाशिव बर्वे, लेखक, पत्रकार, संपादक, नाटककार, कादंबरीकार अनिल सदाशिव बर्वे यांचा जन्म १७ जुलै १९४८ रोजी झाला.

डोंगर म्हातारा झाला, अकरा कोटी गॅलन पाणी या कादंबर्‍या, तर कोलंबस वाट चुकला, हमिदाबाईची कोठी, मी स्वामी देहाचा या नाटकांच्या लेखनाबरोबर नक्षलवादी चळवळीसंबंधी त्यांनी खळबळजनक लेख लिहिले.

वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालेल्या बर्व्यांनी नक्षलवादी चळवळीसंबंधी “रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता” हे पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी “स्टडफार्म” (कादंबरी) थॅंक्यू मि. ग्लाड, पुत्रकामोष्टी, आकाश पेलताना आदी नाटके आणि “मा निषाद”, “फाशीगेट” हे कथासंग्रह लिहिले.

त्यांचं निधन ६ डिसेंबर १९८४ रोजी झाले.