अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत.
मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी एकूणच दिसून येणार्या औदासीन्यामुळे या भाषेचे भवितव्य काय असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. वरकरणी पाहता हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा वाटतो. पण त्यावरचा उपायही अगदी सोपा असल्याचा उलगडा शुध्दलेखनकार अरुण फडके यांच्यासारख्या मराठी भाषा जतन करण्यासाठी अविरत धडपडणाऱ्या व्यक्तींशी चर्चेतून होतो.