अरुणा ढेरे

Aruna Dhere


अरुणा ढेरे ह्या मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेल्या लेखिका आहेत. आतापर्यंत त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. एक लेखिका म्हणून त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक निबंध , लघुकथा , कादंबऱ्या, कविता , बालसाहित्य , मोनोग्राफ्स, मालिकांसाठी पटकथा व संवाद अशा विविध विभागात लेखन केले आहे.

त्यांनी त्यांचं शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे. त्यांनी मराठी विषयातून बी.ए. व एम. ए. पदवी प्राप्त केली आहे. ह्या दोन्ही वेळेस त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. त्यांनी बी.ए. १९७७ साली व एम.ए. १९७९ साली पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. पुढे १९८६ साली त्यांनी पुणे विद्यपीठामधून पीएच.डी.  पदवी प्राप्त केली. त्यांनी पीएच. डी. पदवी मराठी साहित्यात मिळवली आहे.

तशी त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यातील काहींची नावं सांगायची झाल्यास

वैचारिक

१) अंधारातील दिवे

२) उंच वाढलेल्या गवताखाली

३) उमदा लेखक, उमदा माणूस

४) उर्वशी

५) कवितेच्या वाटेवर

६) काळोख आणि पाणी

७) जाणिवा जाग्या होताना

८) जावे जन्माकडे

९) त्यांची झेप त्यांचे अवकाश

कथासंग्रह

१) अज्ञात झऱ्यावर

२) काळोख आणि पाणी

३) कृष्णकिनारा

४) नागमंडल

५) प्रेमातून प्रेमाकडे

६) मन केले ग्वाही

७) मनातलं आभाळ

८) मैत्रेयी

कवितासंग्रह

१) निरंजन

२) प्रारंभ

३) मंत्राक्षर

४) यक्षरात्र

५) बंद अधरों

अरुणा ढेरे यांना राज्य सरकारी संस्थांकडून सुमारे ४० पुरस्कार व बक्षिसे मिळाली आहेत ज्यात खालील पुरस्कार समाविष्ट आहेत.

) कवी केशवसुत पुरस्कार (राज्य सरकार)

२) बालकवी पुरस्कार (राज्य सरकार)

३) बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार डॉ. (राज्य सरकार)

४) महाराष्ट्र साहित्य परिषद कवी कुसुमाग्रज पुरस्कार

५) केसरी-मराठा संस्थेचे साहित्य सम्राट एन सी केळकर पुरस्कार.

अरुणा ढेरे ह्या ख्यातनाम इतिहासकार रामचंद्र चिंतामणी ढेरे ह्यांच्या कन्या आहेत. त्या सध्या ६३ वर्षांच्या आहेत. २०१९ साली त्यांनी यवतमाळ येथे झालेल्या अ.भा.मराठी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलं होतं. हे ९२ वे साहित्य संमेलन होते. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

#Aruna Dhere