२५ ऑक्टोबर १९३७
१९३७> संगीताचार्य अशोक दामोदर रानडे यांचा जन्म. “म्युझिकॉलॉजी” (संगीतशास्त्र) या विषयांचे मराठीतील दालन त्यांच्यामुळे समृद्ध झाले, “व्हॉइस कल्चर” (आवाज साधनाशास्त्र) हा शब्दही मराठीत त्यांच्यामुळे रुजला. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक, राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राचे उपसंचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. “भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ”, “संगीताचे सौंदर्यशास्त्र”, “लोकसंगीतशास्त्र” अशी मराठी पुस्तके, तर मराठी व भारतीय नाट्यसंगीत, चित्रपट संगीत आदींवर इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली होती. जुलै २०११ मध्ये ते निवर्तले.
mss