सिद्धहस्त लेखक अशोक शेवडे यांचा जन्म २४ जानेवारी १९४४ रोजी झाला.
अशोक शेवडे यांचा साहित्य, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट जनसंपर्क होता या सर्वांपेक्षा सुद्धा प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध जोडणारे, माणुसकीच्या नात्याने वागणारे संयमी, सुहास्यवदन, संवेदनाशील सौजन्याने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते.
देशभरातील नामवंत साहित्यिक, तसेच चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी यांसह शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिगगजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या.
जुन्या काळी दूरदर्शनवर दर शुक्रवारी त्यांची विशेष व्यक्तिमत्व सोबत मुलाखत कार्यक्रम होत असे. अशोक शेवडे यांनी मुंबई दूरदर्शनवर वीस वर्षात गजरा, रूपेरी, मुखवटे आणि चेहरे,नाट्यावलोकन, रंगतरंग असे ३०० हून अधिक कार्यक्रम केले होते.
अशोक शेवडे यांनी उठ मर्दा कोंबडं आरवलंय हे लोकनाट्य लिहिले होते. या नाटकाचे दिग्दर्शक होते दिलीप कोल्हटकर, या लोकनाट्यच्या निर्मात्या माया जाधव होत्या. तसेच अशोक शेवडे यांनी पण लक्षात कोण घेतो? या दूरदर्शन नाटिकेचे लेखन-दिग्दर्शन केले होते.
अशोक शेवडे यांनी अनेक जाहिरातपट-माहितीपटांचे दिग्दर्शन केले. अशोक शेवडे यांची निर्मिती सूर तेच छेडिता (वाद्यवृंद ) व चंदेरी सोनेरी (आठवणीचा कार्यक्रम) हे कार्यक्रम महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते.
अशोक शेवडे यांचे १८ मार्च २०२० रोजी निधन झाले.