२२ जुलै १९०८
१९०८> इंग्रजी वाङमयातील आधुनिकतेच्या परंपरेचा वेध घेणारे अनुवादक आणि लेखक भालचंद्र महेश्वर गोरे यांचा जन्म. “लघुतमकथा” हा प्रकार अधिक रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. “आधुनिक आंग्लवाङमय” हे पुस्तक त्यांनी लिहिले, अॅम्ब्रोज बिअर्सच्या लघुकथांचा अनुवाद केला. थॉमस हार्डीच्या कादंबरीचा “गर्दीपासून दूर, मनोर्यावर” हा अनुवाद, तसेच होमरचे “इलियड” व शेक्सपिअरच्या नाटकांचा परिचय करुन देणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली. याखेरीज अनेक स्वतंत्र लघुकथा, लघुतमकथा व बालवाङमयही त्यांनी लिहिले होते.
mss