दया पवार

Daya Pawar

दया पवार यांनी लिहिलेलं बलुतं नावाच आत्मचरित्र, हा आजही अजरामर मराठी साहित्य कलाकृतींच्या दालनामधील एक मैलाचा दगड मानला जातो. नाना तर्‍हेच्या अमानुष अत्याचार व भीषण अन्याय सोशीत वर्षानुवर्षे भणंग व बकाल जिणे जगणार्‍यांमधल्या दलित बंडखोर तरूणांचा जीवनपट वास्तववादी व उत्कट शैलीत उलगडणारे हे आत्मचरित्र महाराष्ट्रामधल्या कानाकोपर्‍यांमध्ये तुफान लोकप्रिय झाले. अशा तर्‍हेने मराठी वाड्मयसृष्टीतील आत्मचरित्रांचे पर्व वेगाने सुरू झाले.