डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे

Dr. Akshaykumar Malharrao Kale
जन्म दिनाक: २७ जुलै १९५३

लेखक, समीक्षक डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे यांचा जन्म २७ जुलै १९५३ रोजी झाला.

“स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह” या विषयावर त्यांनी पी.एच.डी. मिळवली असुन “सूक्तसंदर्भ”, “गोविंदाग्रज समीक्षा” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  याखेरीज,  त्यांचे सुमारे १०० समीक्षालेख विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.

डोंबिवली येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

## Dr. Akshaykumar Malharrao Kale