ठाण्यातील संगीत क्षेत्रातील आणखी एक मानाचं नावं व्हायोलिनवादक आणि संगीत विषयात पत्रकारीता करणार्या डॉ. आशा मंडपे होय. एस्. सुब्रमण्यम्, अनंतराव जोग पद्मभूषण पं. व्ही. जी. जोग संगीत विषय घेऊन एम.ए.पी.एच.डी. केलेल्या आशाताईंनी महाराष्ट्रातील आदिवासी वाद्यांवर विशेष संशोधन केले. त्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाची सिनीअर फेलोशिप मिळाली होती. गेली पंधरा वर्षं स्वरसाधना व्हायोलिन अकादमी ठाण्यात चालवून ठाण्यातील युवा पिढीला व्हायोलिनवादनाचे शिक्षण त्या देत आहेत. त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणातून त्यांनी अनेक मान्यवर तसेच उदयोन्मुख व्यक्तींचा परिचय त्यांच्या कामाबद्दल लेखन केले आहे.
पुरस्कार : त्यांना त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत संगीत शिक्षक संघ, मुंबई यांच्यातर्फे गुणीजन पुरस्कार २००८, ठाणे सन्मित्र पत्रकारीता पुरस्कार २०११, गणेश कल्चरल अकॅडमीचा कृतार्थ कलाजीवन पुरस्कार अशा अनेक पुरस्काराशी सन्मानित करण्यात आलं.