डॉ. दामोदर खडसे

Dr. Damodar Khadse

एक नामांकित साहित्यिक. हिंदी साहित्याशी यांचा जवळचा संबंध आहे.

डॉ. खडसे यांची आजवर ३४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या ‘काला सुरज’ या कादंबरीला १९९२ चा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. जयवंत दळवी यांच्या ‘कालचक्र’ या मराठी नाटकाचा तसेच ‘रामनगरी’ या राम नगरकर यांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद त्यांनी केला आहे. ‘अपने ही होने पर’ या हिंदी काव्य संग्रहात विं. दा. करंदीकरांच्या कवितांचा अनुवाद संग्रहित केला आहे.

डॉ. दामोदर खडसे हे हिंदी अकादमीचे कार्याध्यक्ष आहेत. डॉ. खडसे हे २००९ पासून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय हिंदी समितीचे सदस्य आहेत.

जुलै २०११ मध्ये अकादमीच्या कार्याध्यक्षपदी नेमणूकीच्या पूर्वी त्यांनी केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्य म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

डॉ. दामोदर खडसे यापूर्वी पुणे तसेच एसएनडीटी विद्यापीठाच्या अभ्यास समितीचे सदस्य होते. हिंदी भाषेच्या प्रचारासाठी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण योगदानामध्ये ‘कार्यालयीन व व्यावहारिक हिंदी, ‘बॅको मे हिंदी :विविध आयाम’ या पुस्तकांचा समावेश आहे.

डॉ. खडसे यांच्या साहित्यावर पुणे, कोल्हापूर, उज्जैन विद्यापीठांत शोधप्रबंध सादर करण्यात आले आहेत.