डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे

Dr. Surendra Shivram Barlinge
जन्म दिनाक: २० जुलै १९१९
मृत्यू दिनांक: १९ डिसेंबर १९९७ 

डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचा जन्म २० जुलै १९१९ रोजी झाला.

माझे घर, माझा देश, गोष्टींचे गाठोडे हे त्यांचे कथासंग्रह.  आणि मी पण माझे या कादंबरीसह हिंदी, इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.

१३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.

इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली, परामर्श व थिंकर्स अकॅडमी जर्नल (ताज) ही नियतकालिके त्यांनी सुरू केली.

१९ डिसेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले.