जन्म-एप्रिल ३, १८८२
मृत्यू- जून २१, १९२८
नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.