फकिरराव मुंजाजी शिंदे

फ.मुं. शिंदे
Phakirrao Munjaji Shinde
जन्म दिनाक: १९४८

जन्म : १९४८

फकिरराव मुंजाजी शिंदे यांना साहित्यिक वर्तुळात फ.मुं. शिंदे याच नावाने ओळखले जाते. ते मराठी कवी, लेखक आहेत. फ.मुं. शिंदे मराठीचे प्राध्यापकही आहेत.

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील ‘रुपूर’ गावी १९४८ साली शिद्यांचा जन्म झाला.

३१ व्‍या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

फ.मुं. शिंदे यांचे प्रकाशित साहित्य

अवशेष (१९७९)
आई आणि इतर कविता
आदिम (१९७५)
आयुष्य वेचताना
कबंध
कालमान (काव्यसमीक्षा)
गणगौळण
गाथा
गौरवग्रंथ
जुलूस
दिल्ली ते दिल्ली
फकिराचे अभंग
निरंतर
निर्मिकाचं निरूपण
निर्वासित नक्षत्र
पाठभेद
प्रार्थना
फकिराचे अभंग
मिथक
मी सामील समूहात
मेणा
लाकडाची फुले
लोकगाणी
वृंदगान
सार्वमत
सूर्यमुद्रा
स्वान्त (१९७३)
क्षेत्र

पुरस्कार आणि सन्मान

स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठान(जामखेड-औरंगाबाद)चा संत नामदेव पुरस्कार २०१०
कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार (२०११)
पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणारा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार (२०१३)
मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२००९).
मराठी रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपद
सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष (२०१४)
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार (२०१३)