गजानन वामनाचार्य हे मुंबईच्या भाभा अणूसंशोधन केंद्रातून (BARC) सेवानिवृत्त झालेले अणूशास्त्रज्ञ. मराठीसृष्टीचे ते नियमित लेखक आहेत. वामनाचार्य हे वयाच्या पंचाहत्तरीतही अत्यंत जोमाने अणि उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि मासिकातून लिखाण केले आहे. मराठी विज्ञान परिषदेचे मासिक `पत्रिका’चे त संपादक होते. त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे लेखन केले आहे.
वामनाचार्य यांचा जन्म १९३४ मध्ये झाला. नागपूर विद्यापीठाचे एम.एस्सी. (रसायनशास्त्र) असलेले श्री वामनाचार्य BARC च्या किरणोत्सारी एकस्थ आणि प्रारण तंत्रज्ञान (रेडिओआयसोटोप आणि रेडिएशन टेक्नॉलॉजी) या विभागात ३७ वर्षे संशोधन अधिकारी या पदावर कार्यरत होते.
अणुउर्जानिर्मीती संशोधनाला त्यांनी दिलेलं योगदान आजही विज्ञानाच्या प्रत्येक शाखेमधुन वाखाणले जाते. शास्त्रज्ञ असण्याबरोबरच, हे अणुउर्जेचं किचकट व गुंतागुंतीचे तंत्रज्ञान होईल तेवढया सरळ सोप्या भाषेत व रोचक शैलीत असंख्य वाचकांपर्यंत पोहोचविणारे एक अत्यंत बोलके व प्रतिभावंत लेखक ही त्यांनी स्वतःकरिता मिळवलेली ओळख देखील कधीही न पुसली जाणारी अशीच आहे. अणुउर्जेचे विविध पैलु आपल्या पुस्तकांमधून रसिकांना व विशेषतः तरूणांना, रसदार भाषेत उपलब्ध करून त्यांच्यामध्ये विज्ञानवादी अस्मितेची ठिणगी रुजविण्यात ते बेहद यशस्वी ठरले आहेत.
मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा त्यांचा अनोखा छंद आहे. आतापर्यंत ६०,००० हून अधिक आडनावांचा संग्रह पूर्ण झाला असून या संग्रहाचा अक्षरानुक्रमे कोश तयार करण्याचे कार्य सुरु आहे.
आडनावांच्या नवलकथा या विषयावर अनेक मासिके, नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केले आहे. अनेक सामाजिक संस्थांत आडनावांच्या नवलकथा या विषयावर भाषणे केली आहेत. आडनावांच्या अनुषंगानेच मुलामुलींच्या नावांचाही मोठा संग्रह. नावांसंबंधींच्या अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी त्यांचे खास प्रयत्न सुरु आहेत.
टोचणारी, खुपणारी आडनावे बदलण्यासाठी मदत केंद्राची त्यांनी स्थापना केली आहे.
अणुउर्जानिर्मीती संशोधनाला दिलेलं योगदान आजही विज्ञानाच्या प्रत्येक शाखेमधुन वाखाणले जाते. शास्त्रज्ञ असण्याबरोबरच, हे अणुउर्जेचं किचकट व गुंतागुंतीचे तंत्रज्ञान होईल तेवढया सरळ सोप्या भाषेत व रोचक शैलीत असंख्य वाचकांपर्यंत पोहोचविणारे एक अत्यंत बोलके व प्रतिभावंत लेखक ही त्यांनी स्वतःकरिता मिळवलेली ओळख देखील कधीही न पुसली जाणारी अशीच आहे. अणुउर्जेचे विविध पैलु आपल्या पुस्तकांमधून रसिकांना व विशेषतः तरूणांना, रसदार भाषेत उपलब्ध करून त्यांच्यामध्ये विज्ञानवादी अस्मितेची ठिणगी रुजविण्यात ते बेहद यशस्वी ठरले आहेत.
Web Site : http://www.gwaman.com
## Gajanan Wamanacharya