गणपती वासुदेव बेहेरे

Ganapati Vasudeo Behere
संस्थापक आणि संपादक

जन्म दिनाक: १९ सप्टेंबर १९२२ 
मृत्यू दिनांक: ३० मार्च १९८९

गणपती वासुदेव बेहेरे उर्फ ग.वा. बेहेरे हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक आणि संपादक होते. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९२२ रोजी झाला.

बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. ग.वा. बेहेरे यांचे वडील रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती.

सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या परशुरामियन नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची गोमंतकाचे अश्रू नावाची कथा छापली गेली होती.

ग.वा.बेहेरे यांचे ३० मार्च १९८९ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.




Listing
b - १९ सप्टेंबर १९२२ 
d - ३० मार्च १९८९
LS - Dead