मराठी त्याचप्रमाणे संस्कृत भाषांच्या प्राचीन व आर्वाचीन साहित्य प्रवाहांना एकत्रित करण्याबरोबरच, संस्कृत काव्यशास्त्राचा संपन्न इतिहास विस्ताराने गणेश देशपांडे यांनी मराठी रसिकांसमोर कलात्मकते सोबतच रेखीवपणे मांडला आहे. एक अत्यंत विद्वान मराठी साहित्यिक व संस्कृत ज्ञान झर्यांचा सदैव खळखळणारा चालता बोलता शब्दकोष अशी गणेश देशपाडेंची समाजात ख्याती होती.
गणेश देशपाडेंची ऐकुण १२ पुस्तके प्रसिध्द झाली असून, त्यांच्या “भारतीय साहित्यशास्त्र” या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. नागपूर विद्यापीठाने १९६० साली त्यांना डी. लिट्. ही पदवी, तर त्याच वर्षी त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित