१२ सप्टेंबर १९९१
१९९१> स्त्रीमुक्तीचा उदगार साहित्यातून मांडणार्या विदुही गीता जनार्दन साने यांचे निधन. “निखळलेली हिरकणी”, “वठलेला वृक्ष”, “लतिका” या कादंबर्यांतून स्त्रीमुक्तीचा पुरस्कार त्यांनी केला. तर “अविष्कार”, “धुके आणि दहिवर” या कादंबर्यांत राजकीय स्थितीचे चित्र रंगविले. “दीपस्तंभ” ही समाजक्रांतीचे स्वप्न पाहणारी कादंबरी.
चंबळच्या खोर्यात स्वत: फिरुन “चंबळची दस्युभूमी” हे पुस्तक तसेच “भरतमुनीचे नाट्यशास्त्र” या ग्रंथांचे मराठी भाषांतर अशी त्यांची कर्तृत्कमान! “भारतीय स्त्रीजीवन” हे त्यांचे पुस्तक स्त्री-चिंतनात महत्वाचे आहे.
mss