गोपाळ गणेश आगरकर

Gopal Ganesh Agarkar
जन्म दिनाक: 14 जूलै 1856
मृत्यू दिनांक: 17 जुन 1895

(14 जूलै 1856 – 17 जुन 1895)

एक बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक.

जन्म सातारा जिल्हयात टेंभु या गावी गरीब घराण्यात झाला. शिक्षण घेत असतांना विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी स्थापन केलेल्या जहाल विचाराच्या पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले.

लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कुल स्थापन केली. (1880) तसेच केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे सुरु केली (1881). न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारुन परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीत केसरीला लोकप्रियता प्राप्त करुन दिली.

न्यु इंग्लिश स्कुलच्या चालकानी स्थापन केलेल्या डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या फर्ग्यूसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले.