२ ऑगस्ट १९३८
१९३८> राजकीय चर्चानाट्य हा प्रकार मराठीत रुजवणारे गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म. उद्धवस्त धर्मशाळा, चाणक्य विष्णूगुप्त, अंधारयात्रा, रस्ते, एक वाजून गेला आहे, मामका: पांडवाश्वैव ही त्यांची नाटके व दीर्घांक राजकीय भूमिका आणि माणूसपण यांच्यातील ताणतणाव मांडणारे होते. “रहिमतपूरकरांची निबंधमाला” (नाटकी निबंध व चर्चक निबंध) तसेच स्वत:च्या नाटकांच्या प्रस्तावना यांतून त्यांची समीक्षकवृत्ती दिसून येते. चीन-अभ्यास शाखेचे विद्वान, अशी त्यांची ख्याती आहे.
mss